Humrahi

आरोग्यदायी दलिया आणि मूग खिचडी

साहित्य:

दलिया: 30 ग्रॅम
हिरवी मूग डाळ: 15 ग्रॅम
पिवळी मूग डाळ: 15 ग्रॅम
टोमॅटो: 20 ग्रॅम
कांदा: 20 ग्रॅम
वाटाणे: 10 ग्रॅम
तेल - 1/2 लहान चमचा
मीठ - चवीनुसार
हळद - एक चिमूटभर
जिरे- चिमूटभर

पोषण मूल्य:

ऊर्जा: 240 किलो कॅलरीज
प्रथिने: 11.2 ग्रॅम

पद्धत:

  • डाळ आणि दलिया 1 कप पाण्यात 10-15 मिनिटे भिजत ठेवा आणि नंतर पाणी काढून टाका.
  • प्रेशर कुकरमध्ये तेल टाका आणि त्यात जिरे टाका आणि फोडणी द्या.
  • शिजवण्यासाठी भाज्या आणि मसाले घाला.नंतर मिश्रणात धुतलेली डाळ आणि दलिया घाला.
  • मिश्रणात 3 कप पाणी घाला आणि 3 शिट्ट्या किंवा दलिया पूर्ण शिजेपर्यंत प्रेशरवर शिजवा.
  • वाफ सुटली की कुकर उघडा आणि 1 वाटी दही/1 ग्लास ताकासोबत खिचडी वाढा.

तुम्हालाही आवडेल