Humrahi

टिकन आणि ओट्स गुलाटी कबाब

साहित्य:

  • बारीक तुकडे केलेले चिकन- 400 ग्रॅम
  • ओट्स- 3 चमचे
  • रवा- 2 चमचे
  • काळे मिरी पूड- ½ चम
  • जिरे पावडर किंवा जिरे- 1 चमचा
  • कुटलेली लाल मिरची- 2 मिरची
  • चवीनुसार मीठ- 1 पूर्ण
  • भोपळी मिरची चिरलेली - 1 संपूर्ण
  • चिरलेला कांदा- 1 मोठा
  • गाजर- चिरलेले- 1 मध्यम
  • टोमॅटो- 1 पूर्ण
  • लसूण पाकळ्या- 3
  • आले- 1 छोटा तुकडा
  • अंडे- 1 पूर्ण
  • तेल- 15 मिली

पोषण मूल्य:

कॅलरीज –1000kcal किलोकॅलरी
प्रथिने – 45 ग्रॅम

पद्धत:

  1. गाजर, ढोबळी मिरची, कांदा, लसूण, आले हे सर्व चॉपरमध्ये भरड चिरून घेण्यापासून सुरुवात करा.
  2. टोमॅटो आणि कांदा वेगवेगळे आणि जाडसर चिरुन घ्या
  3. एका बाऊलमध्ये, बारीक तुकडे केलेले चिकन, ओट्स, चिरलेल्या भाज्या आणि कांदा व टोमॅटो घाला.
  4. सर्व मसाले, सिझनिंग घाला, फेटलेले अंडे आणि रवा घाला.
  5. सर्व साहित्य मिसळा आणि त्यावर झाकण ठेवा. 5 ते 10 मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या.
  6. ट्रेमध्ये बटर पेपर किंवा मेणकागद लावून घ्या आणि त्यावर तेल लावून घ्या.
  7. मेणकागदावर 2 इंचाचे अंतर ठेवून चमच्याने मिश्रणाचे घाला. (छोटे छोटे ढीग करा)
  8. चमच्याच्या मागील बाजूला किंवा तुमच्या बोटाला तेल लावा आणि या मिश्रणाला कबाबचा आकार देण्यासाठी पसरवा.
  9. हा ट्रे अर्धा तास किंवा कडक होईपर्यंत फ्रिजमध्ये ठेवा. नॉन स्टिक कढईत मध्यम आचेवर कडा तपकीरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा किंवा 180°C वर 15 मिनिटे किंवा तपकीरी रंगाचे होईपर्यंत बेक करा.
  10. तुमच्या आवडीच्या डिपसोबत गरमागरम सर्व्ह करा.

तुम्हालाही आवडेल