गाजर, ढोबळी मिरची, कांदा, लसूण, आले हे सर्व चॉपरमध्ये भरड चिरून घेण्यापासून सुरुवात करा.
टोमॅटो आणि कांदा वेगवेगळे आणि जाडसर चिरुन घ्या
एका बाऊलमध्ये, बारीक तुकडे केलेले चिकन, ओट्स, चिरलेल्या भाज्या आणि कांदा व टोमॅटो घाला.
सर्व मसाले, सिझनिंग घाला, फेटलेले अंडे आणि रवा घाला.
सर्व साहित्य मिसळा आणि त्यावर झाकण ठेवा. 5 ते 10 मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या.
ट्रेमध्ये बटर पेपर किंवा मेणकागद लावून घ्या आणि त्यावर तेल लावून घ्या.
मेणकागदावर 2 इंचाचे अंतर ठेवून चमच्याने मिश्रणाचे घाला. (छोटे छोटे ढीग करा)
चमच्याच्या मागील बाजूला किंवा तुमच्या बोटाला तेल लावा आणि या मिश्रणाला कबाबचा आकार देण्यासाठी पसरवा.
हा ट्रे अर्धा तास किंवा कडक होईपर्यंत फ्रिजमध्ये ठेवा. नॉन स्टिक कढईत मध्यम आचेवर कडा तपकीरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा किंवा 180°C वर 15 मिनिटे किंवा तपकीरी रंगाचे होईपर्यंत बेक करा.