Humrahi

रागी डोसा

साहित्य:

  • 1 वाटी नाचणीचे पीठ
  • ¼ (पाव) वाटी तांदळाचे पीठ
  • ½ (अर्धी) वाटी रवा
  •  ¼ (पाव) वाटी दही
  • 2 टीस्पून चिरलेले आले
  • 1 चिरलेली मिरची 
  • 1 टीस्पून जिरे
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • चवीनुसार मीठ

पोषण मूल्य:

ऊर्जा: 210 किकॅल
प्रथिने: 4 ग्रॅम

पद्धत:

  • एका मोठ्या भांड्यामध्ये नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करा. 
  • त्यामध्ये थोडे दही, आले, हिरवी मिरची, जिरे आणि मीठ घाला.
  • आता पाणी घालून एकत्र करा आणि 10 ते 15 मिनिटे विश्रांती द्या.
  • त्यानंतर डोसा पॅन घ्या, जर पिठ थोडे घट्ट झाले असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालू शकता. 
  • तव्याच्या मध्यभागी पीठ घाला आणि लगेच गोल पसरवा.
  • त्यावर 1 टीस्पून तेल घालून मंद आचेवर शिजवा.
  • डोसा परतवा आणि दोन्ही बाजूंनी शिजवा. पुदीना चटणी किंवा सांभार सोबत सर्व्ह करा.

तुम्हालाही आवडेल