Humrahi

गव्हाच्या पिठाचे चिकन डपलिंग्ज

साहित्य:

  • गव्हाचे पीठ – 60ग्रॅ
  • तेल- 10 मिली
  • बारीक तुकडे केलेले चिकन- 100ग्रॅ
  • किसलेला कांदा- 50ग्रॅ
  • ढोबळी मिरची- 50ग्रॅ
  • गाजर- 50ग्रॅ
  • आले- 5ग्रॅ
  • कोथिंबिरीची पाने- 8 ते 10
  • चवीनुसार मीठ

पोषण मूल्य:

कॅलरीज –563 kcal kcal
प्रथिने – 29 ग्रॅम

पद्धत:

  1. एका कढईत 1 चमचा तेल घ्या- कांदा, लसूण, आले, वर सांगितलेल्या सर्व भाज्या आणि बारीक तुकडे केलेले चिकन घाला, त्यात चवीनुसार मीठ घाला आणि हे सर्व 15 मिनिटे शिजवा.
  2. डपलिंग्जसाठीचे सारण तयार आहे- हे सारण दुसऱ्या प्लेटमध्ये काढा आणि थोडावेळ शिजू द्या.
  3. दरम्यान, गव्हाच्या पीठ नीट मळून त्यात चिमूटभर मीठ, 1 चमचा तेल, आणि पाणी घालून त्याचा गोळा करा. कणकेचा मऊ गोळा करा आणि तो काहीवेळासाठी बाजूला ठेवून द्या.
  4. या गोळ्याचे 7-8 समान भाग करा, त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा, ते गोल आकारात लाटून घ्या.
  5. या पारीच्या मध्ये एक चमचाभर सारण घाला आणि साचा वापरुन डपलिंगचा आकार द्या किंवा सर्व बाजू एकत्र करुन त्याला आकार द्या.
  6. वाफेच्या भांड्यात प्लेट्सवर तेल लावा आणि हे डपलिंग्ज ठेवून 20-25 मिनिटे ते वापेवर शिजू द्या.
  7. बाहेरील आवरण शिजले आहे ना हे तपासा आणि गरमागरम सर्व्ह करा.

You might also like