Humrahi

स्टिम्ड चिकन सलाड

साहित्य:

  • बोनलेस चिकन ब्रेस्ट- 200 ग्रॅ.
  • कांदा- 1 मध्यम आकाराचा ( 150 ग्रॅ)
  • टोमॅटो- 1 मध्यम आकाराचा ( 120 ग्रॅ)
  • काकडी – 1 (150 ग्रॅ)
  • कांदा पात- 2 (15 ग्रॅ)
  • लाल ढोबळी मिरची – 1 मध्यम आकाराची ( 100 ग्रॅ)
  • पिवळी ढोबळी मिरची – 1 मध्यम (100 ग्रॅ)
  • कोथिंबीर – 7-8 काड्या

ड्रेसिंग

  • चक्का- 1 चमचा
  • ऑलिव्ह ऑईल- 1 चमचा
  • आले लसूण पेस्ट- 1 चमचा
  • तमालपत्र- 1
  • मीठ- चवीनुसार
  • काळे मिरे पावडर- ½ चमचा
  • लिंबाचा रस- ½ चमचा

पोषण मूल्य:

कॅलरीज- 425 kcal
प्रथिने- 56 ग्रॅ.

पद्धत:

  1. चिकन ब्रेस्ट धुवा, लहान तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये ठेवा. त्यात आलं-लसूण पेस्ट, तमालपत्र घाला आणि १०-१५ मिनिटं शिजवा.
  2. वर सांगितलेल्या सर्व भाज्या तुम्हाला हव्या त्या आकारात चिरुन घ्या.
    ड्रेसिंग तयार करण्यासाठी:
  3. एक छोटा डबा/काचेची बरणी घ्या – त्यात १ टेबलस्पून हँग कर्ड, मीठ, मिरी पावडर, लिंबाचा रस आणि १ टीस्पून ऑलिव्ह तेल टाका।
  4. ड्रेसिंग चांगले होण्यासाठी ते व्यवस्थित हलवा.
  5. एका वाटीत शिजवलेले चिकन आणि भाज्या एकत्र करा. चवीनुसार ड्रेसिंग घाला.

तुम्हालाही आवडेल