हृदय निकामी होण्याची लक्षणे तुमच्या स्थितीच्या प्रकार आणि तीव्रतेवर अवलंबून भिन्न असतात. जोपर्यंत तुम्ही कठोर शारीरिक क्रियाकलाप करत नाही तोपर्यंत हृदय सौम्यपणे निकामी होणे ओळखले जाऊ शकत नाही. तुमचे हृदय डाव्या किंवा उजव्या बाजूने निकामी झाले आहे का यावर अवलंबून तुमची लक्षणे निराळी असू शकतात. तथापि, दोन्ही प्रकारची लक्षणे उद्भवू शकतात. जसजसे तुमचे हृदय कमकुवत होते तसतशी लक्षणे वारंवार खराब होतात. हृदय निकामी होण्यामुळे गंभीर, कधीकधी प्राणघातक परिणाम होऊ शकतात.
प्रारंभिक चेतावणी चिन्हे / लक्षणे::
- पायऱ्या चढण्यासारख्या सामान्य कार्यांच्या वेळी श्वास लागणे हे तुम्ही अनुभवू शकता अशा पहिल्या लक्षणांपैकी एक आहे.
- हृदय कमकुवत झाल्यामुळे, कपडे घालताना किंवा खोलीत फिरताना आणि आडवे पडून विश्रांती घेतानाही तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतोs
- डाव्या बाजूने हृदय निकामी होणे: श्वास घेण्यास त्रास, खोकला, विश्रांतीनंतरही प्रचंड थकवा, सर्वसामान्य अशक्तपणा, निळसर बोटे आणि ओठ, झोपाळूपणा आणि लक्ष केंद्रित करण्यास त्रास, आडवे पडून झोपता न येणे अशा समस्या उद्भवू शकतात
- उजव्या बाजूने हृदय निकामी होणे: मळमळ, भूक न लागणे, पोटात दुखणे, गुडघे, पाऊले, पाय, ओटीपोट आणि मानेतील नसांमध्ये सूज येणे, वारंवार लघवी होणे आणि वजन वाढणे.
तुम्हाला वरीलपैकी एक किंवा अधिक चिन्हे / लक्षणे असल्यास, ती तुमच्या आरोग्यसेवा कार्यसंघाला कळवा आणि तुमच्या हृदयाच्या मूल्यांकनासाठी विचारा, जरी तुम्हाला हृदयाच्या कोणत्याही समस्येचे निदान झाले नसले तरीही.
संदर्भ:
- National Heart, Lung and Blood institute. https://www.nhlbi.nih.gov/health/heart-failure.
- अमेरिकन हार्ट एसोसिएशन. हृदयविकाराचा झटका आणि मस्तिष्काघाताची लक्षणे. https://www.heart.org/en/health-topics/heart-failure/warning-signs-of-heart-failure.
.