दही, लिंबाचा रस- आले लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, जिरे पावडर आणि मीठ घालून चिकन 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करा.चिकनवर मॅरिनेटचा थर व्यवस्थित बसेल याची खात्री करुन घ्या.
गव्हाचे पीठ चांगले मळून घ्या आणि त्याचा गोळा बाजूला ठेवून द्या.
ग्रील पॅन गरम करा- त्यात 1 चमचा तेल घाला आणि नंतर मॅरिनेट केलेले चिकन घाला, वरुन तेल शिंपडा आणि हे 15-20 मिनिटे शिजवा. दोन्ही बाजूंनी चांगले शिजवून घ्या.
चिकन टिक्का तयार झाला आहे- त्यावर कोथिंबीर घालून सजवा.
कोथिंबीरीची पाने, पुदीन्याची पाने, हिरव्या मिरच्या, आले, लसूण, लिंबाचा रस आणि मीठ घालून थोडेसे पाणी घालून अगदी छान मऊ पेस्ट तयार करुन घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट पातळ करुन घ्या.
मळलेल्या पिठाची चपाती/ पोळी लाटून घ्या आणि ती हलक्या तपकीरी रंगाची होईपर्यंत थोड्याशा तेलावर भाजून घ्या.
एकत्र करण्यासाठी- चपातीवर हिरव्या चटणीचा एक थर पसरवा. त्यावर चिकन टिक्क्याच्या थोड्याशा पट्ट्या ठेवा. त्याच्या सगळ्यात वर कापलेले कांदे, टोमॅटो, काकडी घाला. रॅपिंग पेपरच्या मदतीने या चपातीची व्यवस्थित गुंडाळी म्हणजे रोल करा.