Humrahi

चेप्पला पुलुसू

साहित्य:

  • मासे – 330 ग्रॅ
  • तेल- 10 मिली
  • मोहरीचे दाणे- 5 ग्रॅ
  • मेथीदाणे- 5 ग्रॅ
  • सुक्या मिरच्या – 5 ग्रॅ
  • कडीपत्त्याची पाने- 10 ग्रॅ
  • कांदा- मध्यम आकाराचे 2 किंवा 200 ग्रॅ
  • टोमॅटो- 2 किंवा 150 ग्रॅ
  • जिरे पावडर- 1 चमचा
  • आले लसूण पेस्ट- 10 ग्रॅ
  • हळद- 1 चमचा
  • चिंच (सुकी)- 50 ग्रॅ
  • हिरव्या मिरच्या (चिर दिलेल्या )- 1
  • पाणी- 600 मिली
  • कोथिंबीर (चिरलेली) -10 ग्रॅ
  • मीठ- चवीनुसार
  • लाल मिरची पावडर- चवीनुसार

पोषण मूल्य:

कॅलरीज – 750 किलोकॅलरी
प्रथिने – 66 ग्रॅ

पद्धत:

  • माशाचे 1 इंच जाडीचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या.
  • कांदा आणि टोमॅटो चिरुन तयार ठेवा.
  • सुकी चिंच ½ कप कोमट पाण्यात काही मिनिटे भिजवून घ्या,
  • कोमट पाण्यात चिंच पिळून त्याचा चांगला कोळ काढून घ्या.
  • चिंचेचे पाणी गाळून घ्या आणि बाजूला ठेवा. उरलेल्या चिंचेच्या कोळात आणखी 100 मिली कप पाणी घालून तो कोळही घट्ट पिळून घ्या.
  • परत गाळून घ्या आणि बाजूला ठेवा. हे चिंचेचे पाणी वापरा.
    सूचना- जर चिंचेची पेस्ट वापरत असाल ( दुकानातून आणलेली, दुप्पट घट्ट) तर त्यात फक्त रश्शाच्या म्हणजे करीच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला.
  • तुम्हाला आवडणाऱ्या आंबट चवीनुसार चिंचेचा वापर करा.
  • एका भांड्यात 2 चमचे तेल गरम करा आणि मोहरीचे दाणे, मेथीचे दाणे, सुक्या लाल मिरच्या तसेच कडीपत्ता घाला, ते काही सेकंद तडतडू द्या.
  • बारीक चिरलेला कांदा घाला आणि मध्यम आचेवर कांदा पारदर्शी होईपर्यंत परतून घ्या. आले –लसूण पेस्ट घाला आणि 1 मिनिटं परतून घ्या.
  • त्यात हळद पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेला टोमॅटो घाला. मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटे टोमॅटो मऊ होईपर्यंत हे शिजवा.
  • 250 मिली. पाणी घाला आणि 5 ते 8 मिनिटे ते उकळू द्या.
  • त्यात 100 मिली चिंचेचा कोळ घाला आणि 250 मिली पाणी घाला आणि त्याला 5 मिनिटे उकळू द्या.
  • आता या भांड्यात माशाचे तुकडे अत्यंत काळजीपूर्वक ठेवा, त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.
  • हे चमच्याने हलवण्याऐवजी भांडे चांगले काळजीपूर्वक हलवा. म्हणजे माशांचे तुकडे मोडणार नाहीत.
  • झाकण ठेवून फिश करी शिजेपर्यंत 10 ते 12 मिनिटे शिजू द्या, मधेमध्ये भांडे गोल फिरवत राहा आणि हलवत राहा.
  • करीला दाटसरपणा येईपर्यंत आणि चिंचेचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत शिजवा.
  • गॅसची आच कमी करा, मीठ घाला, झाकण ठेवा आण आता मंद आचेवर 10 ते 12 मिनिटे शिजवा. करी चांगली घट्ट होऊ द्या आणि त्यातून तेल वेगळे सुटायला लागू द्या.
  • तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि पुन्हा बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा.
  • आंध्रा चेपला पुलुसू (फिश करी) ही चविष्ट डिश साधा भात किंवा नाचणी मुद्द्यांबरोबर (रागी संकाटी/ रागी संगत) सर्व्ह करा.

तुम्हालाही आवडेल