Humrahi

ॲवोकॅडो आणि फुलकोबी हम्मस

साहित्य:

उकडलेले चणे - 1 कप
ॲवोकॅडो - 1 मध्यम आकाराचा
फुलकोबी - 1 मध्यम आकाराचा
तीळ - 1 कप (ताहिनी बनवण्यासाठी)
ऑलिव्ह तेल - 1 मोठा चमचा
लिंबाचा रस - 2 लहान चमचा
3 लसूणाच्या पाकळ्या
जिरे पावडर - ¼ लहान चमचा
मीठ – चवीनुसार
काळी मिरी - चवीनुसार
लाल मिर्चीचे फ्लेक्स - टॉपिंगसाठी

पोषण मूल्य:

ऊर्जा: 180 किलो कॅलरीज
प्रथिने: 14.5 ग्रॅम

पद्धत:

  • ताहिनी तयार करण्यासाठी, तीळ भाजून घ्या, आणि तीळाचा भुगा होईपर्यंत, त्याच मिश्रणात ½ मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल घाला आणि मिक्स करून मऊसर पेस्ट बनवा.
  • फूड प्रोसेसरमध्ये चणे, ताहिनी, लिंबाचा रस, जिरे पावडर, लसूण पाकळ्या घालून काही बर्फाचे तुकडे टाका आणि मऊसर फुगलेली पेस्ट बनवा.
  • आपण इच्छित दाटपणा येईपर्यंत हळूहळू एका वेळी एक चमचा अशाप्रकारे तेल घाला.
  • मीठ आणि मिरपूडीसह खमंग बनवा.बेस तयार आहे.
  • अॅव्होकॅडोसह बनवण्यासाठी, सोललेला चिरलेली अॅव्होकॅडो बेसमध्ये घाला आणि गुळगुळीत पेस्ट बनवण्यासाठी ते एकत्र करा.
  • एका वाडग्यात वाढा, त्यावर ऑलिव्ह ऑईल शिंपडा आणि चिली फ्लेक्स घाला.
  • फुलकोबीसह तयार करण्यासाठी, प्रीहिटेड ओव्हनमध्ये, फुलकोबीला तेल लावा, मीठ आणि मिरपूड टाकून टॉस करा.s
  • ते शिजेपर्यंत 20-25 मिनिटे बेक करा.(तुम्ही फुलकोबी बेक करण्याऐवजी रॅकवर भाजून घेऊ शकता).थंड होऊ द्या.
  • बेसमध्ये भाजलेली फुलकोबी घाला आणि मऊसर पेस्ट तयार करण्यासाठी एकत्र करा.
  • एका वाडग्यात वाढा, त्यावर ऑलिव्ह ऑईल शिंपडा आणि चिली फ्लेक्स घाला.

तुम्हालाही आवडेल