Humrahi

गरोदरपणात रक्तदाबाचे व्यवस्थापन

मीठ आणि उच्च सोडियमयुक्त पदार्थ टाळा

  • स्वयंपाक करताना जास्त मीठ वापरणे टाळा.
  • त्याऐवजी, तुमच्या पाककृतीची चव वाढवण्यासाठी वनौषधी आणि मसाले वापरा.
  • प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड आणि स्पोर्ट्स ड्रिंक्सपासून दूर रहा.
  • डबाबंद पदार्थ टाळा कारण त्यात बऱ्याचदा मीठ जास्त असते.

 

नियंत्रित श्वासोच्छ्वास

  • आरामात पाठीवर झोपा.
  • तुमचे हात तुमच्या छातीवर आणि बरगडीच्या पिंजऱ्याखाली ठेवा.
  • तुमच्या नाकाद्वारे हळूहळू श्वास घ्या आणि पोट वर जात असल्याचे अनुभवा.
  • ओटीपोटाचे स्नायू ताठर ठेवत हळूहळू 5 पर्यंत श्वास सोडा.
  • नियमित आणि मंद श्वास घेताना 10 वेळा पुन्हा करा.

 

चालण्याचा आनंद घ्या

  • दररोज कमीतकमी 30 मिनिटे किंवा आठवड्यातील बहुतेक दिवस व्यायाम करा.
  • सुरुवातीच्या काळात असलेल्यांसाठी, कमी तीव्रतेचे चालणे किंवा पोहणे हे चांगले पर्याय आहेत.
  • कोणताही वर्कआउट प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी, नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

  • तुम्ही घालावेत अशा पदार्थांमध्ये रताळी, टोमॅटो, श्रावण घेवडा, संत्र्याचा रस, केळी, मटार, बटाटे, सुकामेवा, खरबूज आणि कॅन्टालूप यांचा समावेश आहे.

 

संगीत ऐका

  • दिवसातून 2 किंवा 3 वेळा कमीत कमी 30 मिनिटे योग्य प्रकारचे संगीत ऐका
  • कमी गतीचे आणि कमी पट्टीतील संगीत, शब्दाविनाचे किंवा मोठ्या आवाजाच्या वाद्यसंगीताविना, लोकांना शांत करू शकते

 

तुमच्या वजनावर लक्ष ठेवा

  • योग्य आहार आणि नियमित व्यायाम हे गर्भधारणेदरम्यान तुमचे वजन वाढवण्याचे मार्ग आहेत
  • जास्त वजन असण्यामुळे पाठदुखी, अतिथकवा आणि पायात पेटके यासारख्या गर्भधारणेशी संबंधित अतिरिक्त आरोग्यसमस्यांची शक्यता वाढते.

 

संदर्भ:

  1. “High Blood Pressure during Pregnancy.” Centers for Disease Control and Prevention, 2019, www.cdc.gov/bloodpressure/pregnancy.htm.
  2. Kattah, Andrea G., and Vesna D. Garovic. “The Management of Hypertension in Pregnancy.” Advances in Chronic Kidney Disease, vol. 20, no. 3, May 2013, pp. 229–239, https://doi.org/10.1053/j.ackd.2013.01.014.