बॉईल्ड एग्ज वुईथ ग्वाकामोल
साहित्य:
- ॲव्होकॅडो - ½ तुकडा
- कांदा [चिरलेला] – 50 ग्रॅम
- टोमॅटो- [अर्धे केलेले] - 50 ग्रॅम
- ढोबळी मिरची [चिरलेली]- 50 ग्रॅम
- अंड्याचा पांढरा बलक [उकडलेल्या]- 2 (30 ग्रॅ)
- मीठ- चवीनुसार
- मिरे- चवीनुसार
- जॅलेपिनो- बारीक चिरलेले (20 ग्रॅ)
- बेसिलची पाने [चिरलेली]- 1 चमचा
पोषण मूल्य:
कॅलरीज –92.5 किलोकॅलरी
प्रथिने – 6.4g ग्रॅ
पद्धत:
- अंडी 10 मिनिटे उकडून घ्या. ती सोलून त्यातील पिवळा भाग चमच्याने काढून बाजूला ठेवून द्या.
- ॲव्होकॅडो अर्धे करुन घ्या आणि त्यातील बिया काढून टाका. ॲव्होकॅडोचा चमच्याने गर बाऊलमध्ये काढून घ्या, त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, जॅलेपिनोज, मीठ, मिरेपूड मिसळा आणि ताजे लिंबू पिळून त्याचा रस घाला. आता हे सर्व काट्याने मिक्स करा. ॲव्होकॅडो मॅश होईपर्यंत आणि सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत हे सर्व काटा चमच्याने मिक्स करत राहा.
- अंड्याच्या काढलेल्या पिवळ्या भागाच्या रिकाम्या जागेवर ग्वाकामेल डिप घाला. ताज्या बेसिल पानांनी सजावट करा.