चिकन टिक्का काठी रोल
साहित्य:
- बोनलेस चिकन ब्रेस्ट,उभ्या पट्ट्यांमध्ये कापलेले- 125 ग्रॅ
- योगर्ट (दही)- ¼ कप [60 मिली]
- लिंबाचा रस- ½ चमचा
- आले-लसूण पेस्ट- 7.5 ग्रॅम
- लाल मिरची पावडर- ½ चमचा
- हळद- ½ चमचा
- गरम मसाला पावडर- ½ चमचा
- जिरे पावडर- ½ चमचा
- मीठ, चवीनुसार
- तेल- 1 चमचा
- कांदा- 50 ग्रॅ
- टोमॅटो- 50 ग्रॅ
- गव्हाचे पीठ- 30 ग्रॅ
- कोथिंबीरीची ताजी पाने- 15 ग्रॅ
- पुदीन्याची पाने- 15 ग्रॅ
- हिरव्या मिरच्या- 1ते 2
- आले- 5ग्रॅ
- मीठ- चवीनुसार
पोषण मूल्य:
कॅलरीज –392 किलोकॅलरी
प्रथिने – 36 ग्रॅम
पद्धत:
- दही, लिंबाचा रस- आले लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, जिरे पावडर आणि मीठ घालून चिकन 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करा.चिकनवर मॅरिनेटचा थर व्यवस्थित बसेल याची खात्री करुन घ्या.
- गव्हाचे पीठ चांगले मळून घ्या आणि त्याचा गोळा बाजूला ठेवून द्या.
- ग्रील पॅन गरम करा- त्यात 1 चमचा तेल घाला आणि नंतर मॅरिनेट केलेले चिकन घाला, वरुन तेल शिंपडा आणि हे 15-20 मिनिटे शिजवा. दोन्ही बाजूंनी चांगले शिजवून घ्या.
- चिकन टिक्का तयार झाला आहे- त्यावर कोथिंबीर घालून सजवा.
- कोथिंबीरीची पाने, पुदीन्याची पाने, हिरव्या मिरच्या, आले, लसूण, लिंबाचा रस आणि मीठ घालून थोडेसे पाणी घालून अगदी छान मऊ पेस्ट तयार करुन घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट पातळ करुन घ्या.
- मळलेल्या पिठाची चपाती/ पोळी लाटून घ्या आणि ती हलक्या तपकीरी रंगाची होईपर्यंत थोड्याशा तेलावर भाजून घ्या.
- एकत्र करण्यासाठी- चपातीवर हिरव्या चटणीचा एक थर पसरवा. त्यावर चिकन टिक्क्याच्या थोड्याशा पट्ट्या ठेवा. त्याच्या सगळ्यात वर कापलेले कांदे, टोमॅटो, काकडी घाला. रॅपिंग पेपरच्या मदतीने या चपातीची व्यवस्थित गुंडाळी म्हणजे रोल करा.