ग्रिल्ड लेमन चिकन
साहित्य:
- चिकन ब्रेस्ट (बोनलेस, स्किनलेस)- 200 ग्रॅ
- दही- 3 टीस्पून (45-50 ग्रॅ)
- लिंबाचा रस- 2 चमचा
- कोथिंबीर- 8-10 पाने
- लसूण- 2 पाकळ्या
- मोहरीचे तेल- 2 चमचा
- वाळवलेले ऑरेगॅनो- 1 चमचा
- मीठ व मीरपूड- चवीनुसार
पोषण मूल्य:
कॅलरीज 300 किलोकॅलरी
प्रथिने – 53 ग्रॅ
पद्धत:
- एका बाऊलमध्ये दही, मसाले, आले लसूण पेस्ट आणि चिकन हे सगळे साहित्य एकत्र करुन चांगले मॅरिनेशन तयार करा, चिकनवर या मसाल्यांचा थर चढेपर्यंत चांगले हलवत राहा.
- कढईत मोहरीचे तेल गरम करा आणि मॅरिनेशनमध्ये तेल घाला.
- हे मिश्रण चांगले मॅरिनेट होण्यासाठी फ्रिजमध्ये किमान 30 मिनिटे ठेवा, जास्त तासांसाठी ठेवता आले तर अधिक चांगले.
- ग्रिल पॅन घ्या- आणि चिकन शिजून मऊ होईपर्यंत 20-25 मिनिटे शिजवा.
- त्यावर लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सजवा.