Humrahi

मूगडाळ चिकन पिझ्झा

साहित्य:

  • हिरव्या सालीची मुगाची डाळ- 1 कप, 
  • ओट्स [पूड/ पावडर]- 2 चमचा,
  • चिकन- 50 ग्रॅ,
  • लाल मिरची पावडर- 1 चमचा,
  •  गरम मसाला- 1 चमचा,
  • हळद- 1 चमचा,
  • दही- 1 चमचा,
  • धणे पावडर- 1 चमचा,
  • कांदा – 1 [बारीक चिरलेला],
  • गाजर – ½ [किसलेले],
  • कोथिंबीरीची पाने- 2 चमचा
  • ढोबळी मिरची – 2 चमचा [छोटे तुकडे],
  • किसलेले पनीर/ चीज- 2 चमचा
  •  मिरेपूड – 1 चमचा
  • मीठ- चवीनुसार
  • तेल- 1 चमचा
  •  चिली फ्लेक्स- 1 चमचा
  •  ओरेगॅनो- 1 चमचा

पोषण मूल्य:

कॅलरीज- 524 kcal
प्रथिने- 42 ग्रॅ

पद्धत:

  1. 1 कप हिरव्या सालीची मुगाची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घाला
  2. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात थोडे पाणी आणि ओट्स घालून त्याची पेस्ट तयार करुन घ्या
  3. त्यात थोडे मीठ घाला आणि 30 मिनिटे तसेच ठेवून द्या.
  4. एका बाऊलमध्ये चिकन घ्या, त्यात लाल मिरची पावडर, दही,गरम मसाला,धणे पावडर, हळद,दही, मिरेपूड आणि मीठ घाला आणि ते 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करा.
  5. एका नॉन-स्टिक कढईत तेल गरम करा आणि मॅरिनेट केलेले चिकन त्यात घाला आणि ते प्रत्येक बाजूने थोडेसे सोनेरी होईपर्यंत चांगले शिजवून व परतून घ्या, त्यानंतर ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापा.
  6. एका बाऊलमध्ये गाजर, चिकन, कांदा, ढोबळी मिरची व कोथिंबीरीची पाने, काळे मिरीपूड आणि मीठ घ्या व हे सगळे चांगले एकजीव करुन घ्या.
  7. तवा / कढईत थोडेसे तूप किंवा तेल घाला आणि बेस तयार करण्यासाठी सर्व मिश्रण त्यावर सपाट करुन घाला.
  8. त्यावर टॉपिंग्ज व किसलेले पनीर / चीज घाला आणि हर्ब्स तसेच चिलीफ्लेक्स घाला. त्यावर काही मिनिटांसाठी झाकण ठेवा. तुमचा पिझ्झा आता खाण्यासाठी तयार आहे!

You might also like