Humrahi

राजगिरा बुरिटो बाऊल

साहित्य:

  • 1 कप पाणी
  • ½ कप राजगिरा
  • उकडलेले राजमा
  • टोमॅटो (1/2 कप)
  • कांदा (1/2 कप)
  • फरसबी (1/4 कप)
  • गाजर (1/4 कप)
  • कणसाचे दाणे (1/2 कप)
  • लिंबाचा रस
  • ½ कप आंबट मलई

पोषण मूल्य:

ऊर्जा: 626 किलो कॅलरीज
प्रथिने: 20.68 ग्रॅम

पद्धत:

  • एका कढईत राजगिरा आणि 1 कप पाणी घालून उकळ काढा; गॅस मध्यम-कमी करा आणि जाड लापशी तयार होईपर्यंत हलक्या हाताने 20 मिनिटे उकळवा, अधूनमधून ढवळत शिजवून घ्या. गॅस बंद करा. थोडा वेळ थंड होऊ द्या.
  • फरसबी, गाजर आणि कणसाचे दाणे 2 कप पाण्यात उकळून गाळून बाजूला ठेवा.
  • रात्रभर भिजवलेल्या राजमाला ½ चमचा मीठ टाकून 5 शिट्ट्या देऊन शिजवावे. एका कढईत तेल गरम करून घ्या, त्यात राजमा आणि सर्व मसाले घालून मध्यम आचेवर 2 मिनिटे शिजवा. बटाटा मॅशर वापरून मिश्रण थोडेसे मॅश करा.
  • न शिजवलेला सालसा तयार करण्यासाठी - कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस मीठ काळी मिरी लाल मिरची पावडर लिंबाचा रस घाला. चमच्या मागच्या भागाने सर्व साहित्य मॅश करा आणि एकत्र करा.
  • बाऊल तयार करण्यासाठी, राजमा, शिजवलेला राजगिरा, आंबट मलई आणि साल्सा 4 समान भागांमध्ये विभाजित करा. वाढण्यासाठी प्रथम राजगिरा, मग राजमा, नंतर साल्सा आणि आंबट मलई घाला. प्रक्रिया पुन्हा करा आणि गरम सर्व्ह करा.

तुम्हालाही आवडेल